ही .... पटलेली हाय!

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर शिरपूर गाव , कोकणात वसलेलं , तसं लहानसं खेडं , पाचशे - सहाशे वस्तीचं , गणपत व भीमाबाई पाटील हे जोडपे आजारपणात मरण पावले . त्यांचा एकुलता एक मुलगा शिरीष , तेव्हा चार वर्षांचा होता . हे जोडपे अतिशय प्रेमळ , कष्टाळू आणि सहकार्य करणारे असे होते . त्यामुळे गावातील माणसांनी शिरीषचा सांभाळ प्रेमाने , मायेने केला . हा , हा म्हणता वर्षे सरली आणि तो २१ वर्षांचा उमदा तरुण झाला . ऐन तारुण्यात जशी मुला - मुलींना प्रेमाची भुरळ पडते , तसे त्यालाही प्रेमाचे वारे लागले . पण ... ना घर , ना शेती , ना धड नोकरी , मग मुलीला मनातील भावना कशा सांगणार ? त्याने शहरात जाऊन नशीब आजमावयाचे ठरवले आणि लवकरच तो गावकऱ्यांचा निरोप घेऊन शहराकडे निघाला . गावातील वयस्कर व अनुभवी व्यक्ती नाना पाटील , यांनी शिरीषच्या हातावर पैसे ठेवले , तो त्यांना नमस्कार करीत म्हणाला ," नाना हे पैसे व्याजासकट द्यायला मी गावात पुन्हा येईन ." त्याला निरोप दिला आणि गावाचा दिनक्रम पुन्हा सुरु झाला . माझं पोरगं अ...