पुन्हा भेटूया .. ⏳
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर ' भवानी ट्रॅव्हलर ' कोकणच्या दिशेने सुसाट धावत होती . अजय - विजय , ड्रायव्हर - क्लिनरची जोडी २५ प्रवाशांनी भरलेली बस घेऊन गावाकडे निघाले होते . डिसेंबर महिना सुरु झाला होता . थंडीचे दिवस आणि मुलांना सुट्ट्या , त्यामुळे त्यांची ट्रॅव्हलर रोज नवीन - नवीन ठिकाणी जात होती . गेले १५ दिवस , ते दोघेही सतत फिरतीवर होते . आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते मुंबईत पोहचले . थोडावेळ विश्रांती आणि जेवणखाण आटोपून बरोबर दोन वाजता कोकणला जाण्यासाठी त्यांनी ट्रॅव्हलर सुरु केली . साधारण ७ तासांचा प्रवास आहे , आपण नऊ वाजेपर्यंत कोकणात पोहचू , बस दोनदा थांबेल , चहा - पाणी व फ्रेश होण्यासाठी , विजय क्लिनर बसमधील प्रवाश्यांना सांगत होता . ' गणपती बाप्पा मोरया ' अशी प्रार्थना करून बस बरोबर सव्वा दोनला निघाली . प्रवासी जेवण करून निघालेले होते त्यामुळे थोड्यावेळात ते पेंगू लागले . बसमध्ये शांतता पसरली . जवळपास सहावाजेपर्यंत प्रवासी झोपलेले होते . सहा वाजता क्लिनरने आवाज दिला , येथे बस २० मिनिटे थांबणार आहे . हे ऐकताच प्रवासी उठले , बसमधून बाहेर आले . बस एका हॉटेलजव...