Second हनिमून... 🧡

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर तनयाला Bio-technology साठी पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळाले , तिचे शालेय आणि ज्युनिअर कॉलेज शिक्षण कोल्हापूरला झाले होते , मे महिना तनयाच्या शॉपिंग मध्ये गेला . जूनच्या पहिल्या आठवड्यात , तनया पुण्याला जायला निघणार होती . ठरल्याप्रमाणे आज सकाळी ती पुण्याला जायला निघाली , घरातून निघाल्यापासून तनुजा तिला सारख्या सूचना देत होती , एकटी बाहेर जाऊ नको , मैत्रिणींबरोबर रहा , खाण्याकडे लक्ष दे , बाहेरचे जास्त खाऊ नको . शेवटी तनया म्हणाली ," आई आता बस , उरलेल्या सूचना मोबाईलवर पाठव ". इतक्यात ट्रेनचा हॉर्न वाजला आणि ट्रेन सुटली . तुषार आणि तनुजा घरी जाण्यासाठी गाडीत बसले . इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि तनुजा रडू लागली . तनुजाचे रडणे तुषारला अपेक्षित होते , कारण मागील अठरा वर्षे तनया हेच तनुजाचे विश्व होते . त्याने अनेक वेळा तनुजाला समजावण्याचा प्रयत्न केला होता , तनया आता मोठी होत आहे , तू एखाद्या नोकरीचा विचार करू शकते , तुला जर धंद्याची आवड असेल तर मी तुला नक्की मदत करीन , लायब्ररी लावतेस ...