पोस्ट्स

प्लॅशबॅक

इमेज
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर "आई, २ किलो रव्याचे लाडू आजीकडून घेऊन ये, किती छान बनवते ती लाडू! तोंडात घालताच विरघळतो,” अवनी बोलत होती. "अगं अजून माझं ठरलं नाही जायचं, तर तुझ्या demands सुरु," मी तिला म्हणाले. ठरलं नाही म्हणजे? तिकीट book झाले आहे, आता तू कुडाळला जाणार आहेस, मी तुझे सामान pack करायला घेते, असे बोलून ती आतल्या खोलीत गेली.   तिकीट काय, कॅन्सल पण करता येईल! जाऊदे थोडं नुकसान होईल, ऐवीतेवी खर्च होतोच की! आता त्यांना भेटण्याचं कारणच नाही, २० वर्ष उलटली, बराच काळ निघून गेला आहे, मी स्वतःशी बोलत होते. आईशी फोनवर बोलणे तर होत आहे, तिला नंतरही भेटता येईल, आताच घाईने जायची गरज नाही, मी मनाशी ठरवले. शी! काय वेड्यासारखे वागले मी लहानपणी! जरा शहाण्यासारखी वागले असते तर! आज लाज वाटली नसती, शाळेत रुसवे -फुगवे तर होतेच, कॉलेजमध्ये देखील चिडचिड, आणि..... नकोच त्या आठवणी! तेवढयात दारावरची बेल वाजली आणि मी आठवणींतून बाहेर आले. झाली का तुझी तयारी? उद्या सकाळी तुला 'सिंधुदुर्ग एक्सप्रेस' मध्ये बसवून मी ऑफिसला जाईन, आशिष, माझा नवरा बोलत होता. अवनीने आतून आवाज दिला, बा...

कारभारी .. लयभारी!

इमेज
   लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर           " शी !  काय boring आयुष्य आहे ,  no thrill! " लक्ष्मी रागाने म्हणाली .             " असं का म्हणता देवी ? तुमच्याकडे तर दैवीशक्ती आहे , मनात आणाल , ती वस्तू समोर , कामाची दगदग नाही की , जेवणाची गडबड नाही ,  आयुष्य कसं शांत ,  निवांत ," विष्णू हसत म्हणाले .      वस्तूंमुळे तर क्षणभर सुख , दुसऱ्या क्षणाला वस्तूंचा विसर पडतो देवा , जगाचा कारभार चालवण्याच्या निमित्त तुम्हीं सारखे बाहेर असता , कंटाळा येतो आम्हांला , निदान cooking मध्ये काही वेळ तरी जाईल , असे वाटते ," देवी  उदास मनाने बोलली . तुम्हांला कुठे माहित आहे cooking ची झंझट ? सकाळचा नाष्टा , डब्यातील मेनू , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहाबरोबर snacks आणि रात्रीचे पोटभर जेवण , मृत्युलोकातील बायकांना कुठली भाजी आणि कुठला छानसा पदार्थ करायचा याचीच चिंता जास्त असते ," देव म्हणाले . तुम्हांस काय ठाऊक ? तिने आश्चर्याने विचारले . " अगं , पूजा करताना तोंडाने स्तोत्र म्हणत...

Golden Journey

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर      ' स्वप्न निवास ' बंगला आज फुलांच्या माळांनी नटलेला होता, दिव्यांची रोषणाई केली होती, गेटजवळ केळीचे खांब डौलाने उभे होते आणि बॅंडवाले देखील तयार होते. पाहुण्यांना बसण्यासाठी बाहेर हिरवळीवर खुर्च्यांची व्यवस्था केली होती. बंगल्याच्या आत मंद आवाजात सनई चौघडा वाजत होता. पाहुणे मंडळीं यायला सुरवात झाली. घरात नातेवाईकांची गडबड सुरु होती, मंगलमय वातावरण होते.    पटापट नाष्टा करा आणि तयार व्हा, सायली तिच्या मुलांना, सई आणि सुमितला सांगत होती. दुसऱ्या खोलीत सायलीची वहिनी स्मिता, सर्व सामान ताटात व्यवस्थित ठेवत होती पण तिची ६ वर्षाची मुलगी शार्वी सारखी तिच्या पाठीशी लागत होती. तिने तिच्या हातावर लाडू दिला व सांगितले की, सईताई आणि सुमितदादा यांच्याबरोबर खेळ जा, मला त्रास देऊ नको. तिने लाडू हातात घेत विचारले, "आई, लाडू का बनवला?" स्मिता हसत म्हणाली," आज आपल्याकडे गंमत आहे, जा पळ, असे म्हणून तिला पिटाळले."      अप्पा आणि आईंचे आवरले का? हे पाहण्यासाठी ती त्यांच्या खोलीकडे वळली. अहो, किती वेळ आरशात स्वतःला पहात...

चाळिशीतील वादळ 🙆‍♂️

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर           सारखी चिडू नकोस गं , आई मला फोनवर उपदेश देत होती . मी तिला म्हणाले ," तुझ्याकाळी इतकी tensions नव्हती , महागाई नव्हती , शिक्षणात competition नव्हते , मी आणि दादा समंजस होतो त्यामुळे तुला कधी त्रास जाणवला नाही पण आताची मुले हट्टी आहेत , शिस्तबद्ध नाहीत , त्यांना पैशांची किंमत नाही ....           " अगं , किती बोलशील डोकं जरा शांत ठेव ," आई मला थांबवत म्हणाली .                  मला   ऑफिसमध्ये   काम   आहे ,  मी   फोन   ठेवते   असे   म्हणून   मी   कॉल   कट   केला   आणि   जागेवर   येऊन   बसली .  तेवढ्यात   शिपाई   आला   व   म्हणाला ,"  साहेबांनी   तुम्हांला   बोलावलंय ."  मी   लगेच   साहेबांच्या   केबिनमध्ये   गेली . " या   मॅडम   बसा ,  एक ...