बाप्पा ... . .. खोटं बोलायचं ??
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आमचं पंचकोनी कुटुंब , मी , माझे पती , माझी दोन मुलं तनय ( ७ वीत शिकणारा) , तनया (१० वीत शिकणारी ) आणि सासरे . सासरे आध्यात्मिक मार्गाकडे वळलेले , त्यामुळे अधून -मधून आम्हां सर्वांना 'गीतेतील' बोध सांगतात . आज संध्याकाळी, मी आणि सासरे , दोघेजण 'जीवनातील समाधान ' या विषयावर बोलत होतो. तेवढ्यात बेल वाजली , मी लगबगीने दार उघडायला गेली, तोच 'तनया' तणतणत घरात आली. तनया रागाने म्हणाली, "पहिले का आई ; किती खोटं बोलतो हा तनय , आज क्लासला लवकर गेल्यामुळे, मला १ तास बाहेर वाट बघत उभे रहावे लागले”, तनुचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता . तिने घडलेला सारा प्रकार मला सांगितला, एव्हाना तनय घरातून पसार झाला होता . अगं , जेवायला तर येईलच नां ! मग बघते त्याला , मी कशीबशी तनूची समजूत काढली . झाल्या प्रकारामुळे माझ्या चेहऱ्यावरील 'समाधान' एका क्षणात हरवले आणि 'चिंतेचे' सावट पसरले . ते पाहून सासरे म्हणाले, " चिंता वाहतो विश्वाची , असं म्हणणाऱ्या गणरायाचे आगमन पुढच्या आठवड्यात होणार आहे तेव्हा त