आणि भूत ... झाले !
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आई ss.. आणखी किती वेळ अभ्यास कर, मला कंटाळा आलाय, माझे मित्र खेळायला माझी वाट बघत असतील, जाऊ का मी? मी आपला बोलतोय, बोलतोय आणि आई चक्क चंडिका देवीच्या अवतारात माझ्यासमोर उभी, फक्त हातात शस्त्रांऐवजी काठी व पट्टी होती, बाकी चेहऱ्यावरील भाव देवीसारखा म्हणजे माझ्यासारख्या असुराला आता काठीने बोकलून काढू का पट्टीने मारू! कुठे चाललास ? आईने मला दरडावून विचारले. तिच्या या रणरागिणीच्या अवतारापुढे , माझे उत्तर घशातच अडकले . कुठे बरं जाऊन लपावे ? म्हणजे आई मला शोधू शकणार नाही, मी मनात विचार करू लागलो आणि अचानक आठवले की , गावाच्या बाहेर ओढयाजवळ एक पिंपळाचे झाड आहे , त्या झाडावर भूत राहते म्हणून त्या बाजूला कोणीही जात नाही म्हणजे तिचं जागा लपण्यासाठी 'safe ' आहे असे मी मनाशी ठरवले . 'भूत'...