डुलकी ...... प्रवासातली
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर येत्या शनिवारी , सौभाग्यवतींना घेऊन पिच्चरला जाऊया , मस्तपैकी बाहेर जेऊया आणि जमलंच तर एखादं गिफ्ट तिला देऊया असा मी मनात बेत आखत होतो . तेवढ्यात ' साहेबांनी बोलावलंय ' असा सखाराम शिपायाचा कर्कश आवाज माझ्या कानावर आदळला . हातावरील घड्याळात पहिले ५ वाजून २० मिनिटे झाली होती , खरंतर मी घरी निघण्याच्या तयारीत होतो आणि ..... ...... साहेबांनी बोलावलं , कपाळावर एकदम आठ्या उमटल्या , त्या कशाबशा कमी करत प्रसन्न मुद्रेने मी साहेबांच्या केबिन मध्ये धडकलो . या ‘ सावंत ' बसा , साहेबांचा गोड आवाज म्हणजे काहीतरी मोठं काम असणार , असा मी मनात अंदाज बांधला . येत्या शनिवारी तुम्हांला पुणे - ब्रांच ला जायचे आहे . ' आपका हुक्म सर आंखो पर ' असे मनात म्हणत मी ' cabin ' बाहेर पडलो . ' Thank God ’ , ...