पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेव्हा, तिची नि माझी ... भेट

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर         लग्न सोहळा ; आयुष्यातील महत्वाचा , आनंदाचा क्षण ; त्यात तो माझा खास मित्र.   त्यामुळे त्याच्या लग्नाला , मी   हजर राहणारच , मग ऑफिसमध्ये कितीही काम असो . निलेश , माझा जिवलग मित्र , राहायला  आम्हीं दोघेही   पुण्यात , पण त्याची रेशीमगाठ जुळली साताऱ्यात .  मुलीकडची पार्टी मालदार ,  तीन दिवस धूमधडाक्यात लग्न समारंभ पार पडला , मी खूप धमाल केली . लग्नाचे  वऱ्हाड दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी पुण्याला जायला निघणार होते , निलेश मला  वऱ्हाडाबरोबर येण्यासाठी आग्रह करत होता.  " एक दिवस आणखी सुट्टी घेतली तर काय फरक  पडणार आहे",तो म्हणाला  .  मी त्याला हसून म्हणालो , " भावा , जर का उद्या ऑफिसला हजर राहिलो नाही तर सर मला  विचारतील , लग्नात नवरीबरोबर जशी करवली जाते तसा   तू नवऱ्यामुलाबरोबर करवला म्हणून गेला होतास काय " ?   माझ्या या बोलण्यावर तो हसू लागला . " आज रात्र...