भविष्याबद्दल का SSSय बोलू ........ !
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आमची ' गरवारे चाळ ' अगदी बटाट्याच्या चाळीसारखी प्रसिद्ध नाही , पण लोकप्रिय आहे . हि चाळ एक मजली आहे , ग्राउंड आणि पहिला मजला , जिन्याच्या उजव्या बाजूला आठ घरं आणि डाव्या बाजूला आठ घरं म्हणजे ग्राउंडला १६ आणि पहिल्या मजल्यावर १६ अशी एकूण ३२ बिऱ्हाडं या गरवारे चाळीत राहतात . चाळीसमोर मैदान आहे , तिथे लहान मुले खेळतात , कंपाऊंडच्या बाजूला नगरसेवकांनी तीन - चार बेंच आणून ठेवले आहेत बसण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठीपण . ५ ते ६ स्कूटर , ७ ते ८ सायकली आणि हो , चिंटू , मिंटू , सोनू यांच्या tricycle देखील गेटच्या जवळ पार्क केलेल्या असतात . कुणाकडेही आनंदाचा प्रसंग असो वा दुःखाचा , चाळीतील सर्वजण मदतीला धावायचे . लहान - मोठे , गरीब - श्रीमंत असा भेदभाव चाळीत नव्हता , सर्वजण एकोप्याने , आनंदाने रहात होते . ...