An Evening in SwargLok
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आज ऑफिसमधून निघायला जरा उशीरच झाला , मी ठरवले , कि हातातील काम पूर्ण करूनच निघावे , weekend आहे , उगाच सोमवारपर्यंत काम पेंडिंग ठेवायला नको . राजेश चलतोस ना ! सहा वाजले , प्रकाश , माझा मित्र मला बोलवायला आला . " अरे , थोडं काम बाकी आहे , तू पुढे निघ ," मी त्याला म्हणालो . सातच्या सुमारास , मी काम संपवून ऑफिसमधून निघालो . सूर्य मावळतीला चालला होता , सर्वत्र संधिप्रकाश पसरला होता , थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर येताच मन उल्हसित झाले , स्टेशनपर्यंत चालतच जाऊया , असा विचार मनात डोकावला . मग काय ! कानात 'earphone' अडकवला , ' ये शाम मस्तानी' गाणं स्टार्ट केलं आणि स्टेशनच्या दिशने चालू लागलो . चार रस्त्याच्या येथे घाईघाईत cross करायला गेलो आणि बसचा धक्का लागला . मी तोल जाऊन रस्त्यावर पडलो , पाच - पंचवीस माणसे गोळा झाली , अरेरे...