An Evening in SwargLok

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

             आज ऑफिसमधून निघायला जरा उशीरच झाला, मी ठरवले, कि हातातील काम पूर्ण करूनच निघावे, weekend आहे, उगाच सोमवारपर्यंत काम पेंडिंग ठेवायला नको.

  राजेश चलतोस ना ! सहा वाजले , प्रकाश, माझा मित्र मला बोलवायला आला .

  " अरे, थोडं काम बाकी आहे, तू पुढे निघ," मी त्याला म्हणालो

     सातच्या सुमारास, मी काम संपवून ऑफिसमधून निघालो. सूर्य मावळतीला चालला होता, सर्वत्र संधिप्रकाश पसरला होता, थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर येताच मन उल्हसित झाले, स्टेशनपर्यंत चालतच जाऊया, असा विचार मनात डोकावला.

   मग काय कानात 'earphone' अडकवला, 'ये शाम मस्तानी' गाणं स्टार्ट केलं आणि स्टेशनच्या दिशने चालू लागलो. चार रस्त्याच्या येथे घाईघाईत cross करायला गेलो आणि बसचा धक्का लागला. मी तोल जाऊन रस्त्यावर पडलो, पाच-पंचवीस माणसे गोळा झाली, अरेरे जास्त लागलाय का त्याला ? त्याच्या तोंडावर पाणी शिंपडाहॉस्पिटलला नेऊया का ? गर्दीतील माणसे बोलू लागली .

        तेवढ्यात मी उठलो, कपडे झटकले, आजूबाजूला पहिले तर माणसांची गर्दी.

काय झाले ? भाऊ, माणसांची  इतकी गर्दी का ? मी बाजूला उभ्या असलेल्या गृहस्थाला विचारले, पण तो काहीच बोलत नव्हता, मी दुसऱ्या माणसाला विचारले, तो देखील respond करत नव्हता. मग मी बसकडे पहिले, बसच्या जवळ एक माणूस पडलेला होतात्या पडलेल्या माणसाच्या आणि मी घातलेल्या कपड्यांमध्ये कमालीचे साम्य होते, मी चकित झालो, त्याचा चेहरा पाहण्यासाठी मी पुढे गेलो, अरे ! हा तर मीच ...... , म्हणजेssss बसचा धक्का लागून मी मेलो तर ....!

        मी आकाश्याच्या दिशेने खेचला जाऊ लागलोक्षणार्धात एका मोठया सोनेरी दरवाज्यापाशी पोहचलो. "बहुतेक स्वर्गाचा दरवाजा दिसतोय", मी मनात म्हणालो .

 वा ! स्वर्ग, म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यात मी चांगलेच वागत आलोय तर ! कारण हिंदी पिक्चर बघून मला ज्ञात होते कि, 'अच्छा कर्म किया तो स्वर्ग मिलेगा, नहीं तो नरक में जायेगा'कल्पनेतील स्वर्ग आता प्रत्यक्षात दिसणार तर ........

       दरवाजा उघडला गेला, मी आत गेलो, दरवाज्याजवळील द्वारपालाने मला बाजूच्या स्वागतकक्षात बसायला सांगितलेरंभा, उर्वशी, मेनका या अप्सरा स्वर्गात राहतात, हे मी ऐकून होतो, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी माझी नजर भिरभिरत होतीमी एका प्रशस्त कोचावर बसलो. तेथे माणसांची थोडी गर्दी होती, पण कोणीही बोलत नव्हते , कमालीची शांतता त्या स्वागतकक्षात होती. बहुधा मेल्यानंतर तुझं, माझं, पैसा, प्रसिद्धी यापैकी कशाचीच हाव उरत नसेल, त्यामुळे बोलावं तरी कुठल्या विषयावर? माणसांना प्रश्नच पडत असावा

    हळूहळू गर्दी कमी -कमी होत गेली, आता माझा नंबर आलामी द्वारपालाच्या पाठोपाठ जाऊ लागलो, मला एका मोठ्या दरबारात नेले. त्या दरबारात एक व्यक्ती  मोठ्या आसनावर बसली होती, काळाकुट्ट पोशाख, झुपकेदार मिशा, बाजूला रेडा हा सर्व थाट पाहून हे नक्कीच यमराज असतील, असे मला मनोमन वाटले .

  माझी स्वर्गातील जागा निश्चित आहे ना ! मी त्यांना राहवून विचारले.

हा - हा - हा, यमराज जोरजोरात हसू लागले .

"अरे, भल्या माणसा, हा तर तुझा पहिला पडाव आहे, स्वर्ग तो अभी दूर हैं मेरे दोस्त", यमराज हसत म्हणाले.

 मी पृथ्वीच्या वर आलो, खाली गेलो नाही म्हणजे माझी जागा स्वर्गातच आहे, असे मला ..... मी वाक्य पूर्ण करण्याच्या आतच यमराजांनी मला थांबवले.

 ते पुढे म्हणाले, " पूर्वी माझी जागा नरकाच्या बाजूला म्हणजे पृथ्वीच्या खाली होतीतिथेच मी  basic पाप पुण्याच्या हिशोबावर माणसांना वर किंवा खाली पाठवायचो.

 बरेच वर्षांपूर्वी, एक नामवंत बिल्डर मेल्यावर माझ्याकडे आलात्याने मला ,तुमची जागा amenities सहित बांधून देतो असे वचन दिले, मी खुश झालो. पृथ्वीवरील टोलेजंग इमारती मी पहिल्या होत्या, मला देखील हा प्रशस्त ऑफिस बांधून देईल, असा विचार करून माझी जागा त्याला बांधायला दिली. अचानक यमराजांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, ते क्रोधीत झाले

 मग पुढे काय झाले ? मी त्यांना विचारले .

यमराज म्हणाले, " त्याने मला गंडवले, आजतागायत माझ्या ऑफिसचे  काम पूर्ण झाले नाही”.

त्यांचे बोलणे ऐकून मला   हसू आले. मी त्यांना म्हणालो, " भूतलावरील भोळ्याभाबड्या लोकांना हे बिल्डर फसवतात, मग ती लोकं कोर्ट, वकील यांच्यात गुरफटले जातात  आणि निकालाची प्रतीक्षा करतात .

" मी त्याचा निकाल ताबडतोब लावला, सरळ त्याची रवानगी नरकात केली",  यमराज रागाने म्हणाले.  "देवेंद्रजींना विनंती करून माझे ऑफिस मी वरच थाटले आहे”, यमराज नाराजीच्या सुरात म्हणाले.

'देवेंद्रजीं' मी आश्चर्याने विचारले. खालचे देवेंद्रजी ते तुमचे आणि वरचे देवेंद्रजी ते आमचे, यमराजांनी असे सांगताच मी हसू लागलो.

 चित्रगुप्त असे त्यांनी म्हणताच, एक व्यक्ती भलं मोठं रजिस्टर घेऊन आत आली.

    " नरकात साप, विंचू तसेच महाकाय प्राणी आहेत, त्यांना - पाय, अक्राळविक्राळ तोंड असते,असे मी ऐकले आहे, ते माणसांना घाबरवतात, जास्त पापी माणसांना साखळदंडाने बांधतात आणि त्यांना चाबकाचे फटके मारतात, हे सर्व खरं आहे काय" ? मी यमराजांना घाबरतच विचारले.

     त्यांनी त्यांच्या सहाय्यकाला ' झलक दाखव रे' असे म्हणताच त्याने screen  चालू केलामी screen लक्षपूर्वक पाहू लागलो, आपल्या कुटुंबातला कुणी नरकात तर नाही ना ! डोळे मोठे करून करून पाहू लागलो .

      चित्रगुप्ताने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि रजिस्टरमधील माझ्या नशिबाचे पान यमराजांना काढून दिले. आत्तापर्यंत शांत असलेल्या माझ्या मनात विचारांचे तरंग उठायला लागले. मी नेमकं काय जमवले आतापर्यंतच्या आयुष्यात; पाप कि पुण्य ?

 यमराजांनी मला चित्रगुप्ताच्या बरोबर जाण्याची खूण केली, तसा मी त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो .

     तेथून आम्हीं एका प्रशस्त दरबारात प्रवेश केला. तेथील दृश्य पाहून तर माझे डोळे दिपून गेले. दरबारात सौंदर्यवान अप्सरा फिरत होत्या, रंभा, मेनका ,उर्वशी बहुधा ह्याच असाव्यात, असे मला वाटले .   

अनेक देव-देवता आकर्षक पोशाख परिधान करून आसनावर विराजमान झाले होते. एक अप्सरा सुरईतून   पेल्यात काहीसे ओतत होती, कदाचित ते अमृत असावंदरबारातील मंडळी तबकातील पेला उचलत आहेत, हे दृश्य मी दुरून पहात होतो , त्या अप्सरेला लांब यायचा त्रास नको म्हणून मीच पुढे होऊन अमृताचा पेला घ्यायला गेलो. ते पाहून देवेंद्रजीं हसत म्हणाले," थांबा, थांबा अमृत पिण्यास तुम्हीं पात्र आहात कि नाही हे अजून ठरायचे आहे, मी ओशाळलो .

      देवेंद्रजीं अमृताचा घोट घेत घेत माझा भूतकाळ वाचत होते. दरबारातील इतर देव माझ्याकडे निरखून पाहू लागले. Interview देतांना मला जितकी भिती वाटत नव्हती तितकी भिती आज वाटत होती. देवेंद्रजींनी त्या पानावर काहीसे  लिहिले ते रजिस्टर पुढे ने असे, चित्रगुप्ताला खुणेने सांगितले. मी पुन्हा चित्रगुप्ताच्या मागोमाग जाऊ लागलो. दोन पडाव पार झाले होते, तिसऱ्या पडावानंतर माझे भविष्य ठरणार होतं. देवेंद्रजींकडून मला ब्रम्हनगरीत म्हणजेच ब्रम्हदेवाकडे नेण्यात आले. स्वर्गात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे तेथील प्रसन्न वातावरण, only positivity, no negativity  कारण तेथे देवांचा वावर होता.      

       इतक्यात 'अप्सरांचा मोर्चा ' तेथे आला . अहाहा ! काय ते मनमोहक सौंदर्य , त्यांची नितळ त्वचा, कमनीय बांधा, लांबसडक केस, माझी नजर त्यांच्यावर खिळून राहिली. आज मला समजले, माणसं मेल्यावर स्वर्गात जायची इच्छा का करतात ?

 ' ब्रम्हदेव' अप्सरांच्या मधुर आवाजाने मी भानावर आलो.

 " या या आत या, तुम्हीं सर्वजणी एखाद्या विशिष्ट हेतूने आला आहात का"? ब्रम्हदेवाने विचारले.

 "आज तुम्हांला निर्णय घ्यावाच लागणार" सर्वजणी एका सुरात बोलल्या.  

 कोणता  निर्णय? ब्रम्हदेवाने आश्चर्याने विचारले.

 आम्हीं सर्वजणी वेगवेगळ्या  दालनांत कामं करतो, देवांनी सांगितलेल्या कामात चाल - ढकल करीत नाही , स्वर्गात शांतता राहील याची काळजी घेतो पण...   पृथ्वीतलावर कसं  'Best actress' ठरवली जाते, तसं आज तुम्हीं आमच्यात कोण 'श्रेष्ठ' आहे ते ठरवा

 ब्रम्हदेवांचा हसरा चेहरा, अचानक चिंताग्रस्त दिसू लागला .

 मला वाटायचे, देवांना 'समस्या' हा प्रकार माहीतच नसावा, त्यांच्याकडे कसं सगळं आनंदी-आनंद.

 ताणतणाव, आर्थिक चणचण, आजारपण, आपापसातील हेवे -दावे यांसारख्या समस्या तर पृथ्वीतलावरच असतील, पण आज मात्र देवासमोर अवघड प्रश्न उभा राहिला .

  ब्रम्हदेवाने चित्रगुप्ताकडे मोठ्या अपेक्षेने पहिले, पण  त्यांनी मान खाली घातली. मग त्यांनी नजर माझ्याकडे वळवली नजरेनेच सांगितले, " त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे जमतंय का बघा"? देवाने, चक्क माझ्याकडे मदत मागितली, मी खूप खुश झालो .

मी देखील नजरेनेच सांगितले, "प्रयत्न करून बघतो”.

 मी एक दीर्घ श्वास घेतला पुढे म्हणालो," सौंदर्यात तुम्हीं सर्वजणी एकदम सरस आहात, त्यामुळेश्रेष्ठ ' कोण ? ठरवणे फारच कठीण आहे

  तुमची ‘hairstyle’ पण  ‘unique’ आहे, ‘parlour’ मध्ये जाता देखील तुम्हीं केलेली 'hairstyle' उत्कृष्ट आहे, माझ्या या बोलण्यावर त्या हसल्या .

 तुमची वेशभूषा इतकी आकर्षक आहे, कि त्यामुळे  तुमचे सौंदर्य खुलून दिसते.

  अप्सरांचा  बदललेला ‘mood’ पाहून ब्रम्हदेव आनंदित झाले.     

 तुमचा कमनीय बांधा, ३६-२४-३६ या ‘criteria’ मध्ये बरोबर बसतो. माझ्या या बोलण्यावर त्या चक्क लाजल्या.  

  पण sss , या सर्व गोष्टी फक्त दोन मिनिटांत कोण करू शकेल ?

 माझ्या या प्रश्नाने त्या सर्वजणी एकदम स्तब्ध झाल्या, काय बोलावे त्यांना सुचेना .

 चित्रगुप्त लांबून मला आनंदाने 👍 दाखवू लागले.  'बिचाऱ्या अप्सरा' त्यांच्यात थोडी कुजबुज झाली आणि   क्षणार्धात त्या काही बोलता निघून गेल्या.

  "बस2-minutes'  जगातinstant noodles’  व्यतिरिक्त 2 - मिनिटांत काहीच तयार होऊ शकत नाही" असे म्हणून ब्रम्हदेव खो-खो हसू लागले.

ते पुढे म्हणाले," स्रियांच्या प्रश्नांना उत्तर देणे, जसे मानवाला कठीण आहे तसे देवांनाही सोपे नाही, आज तुम्ही माझ्यावर आलेले संकट दूर केलेत, म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हांला जीवनदान देतो.

  ब्रम्हदेव मला सांगू लागले कि,यापुढे रस्त्यात चालतांना head phone, ear phone लावून बोलणे, गाणी ऐकणे टाळा, चालतांना निसर्गाचा आस्वाद घ्या, नजर चौफेर ठेवा, कोणी गरजवंत असेल तर त्याला मदत करा, माणुसकीचा धर्म पाळा.

 मी  त्यांना वाकून नमस्कार केला म्हणालो,

                                     "निरोप घेतो आता देवा,

                                        आज्ञा आपुली असावी,

                                        चुकले असेल माझे काही,

                                          देवा क्षमा करावी.

  त्यांनी 'आयुष्यमान भव :’ असा मला आशीर्वाद दिला चित्रगुप्ताला सांगितले कि, ह्यांना  2- मिनिटांत पृथ्वीतलावर पोहचवा .

"अरे, एखादी  गाडी थांबवून ह्याला हॉस्पिटलला नेऊया का" ? एक गृहस्थ म्हणाले.

तेवढ्यात मी डोळे उघडले म्हणालो," नको, त्याची गरज नाही, मी ठीक आहे, इतके  बोलून मी उठून माझे कपडे झटकू लागलो. मला व्यवस्थित बघून माणसांचा जमाव आश्चर्यचकित झाला

गर्दीतील एक आजोबा बोलले,"  एवढ्या मोठ्या बसचा धक्का लागून देखील तू जिवंत आहेस".

 " देव तारी त्याला कोण मारी ", बसचा ड्राइव्हर त्याच्या समोरील गणपती बाप्पाच्या मूर्तीला नमस्कार करीत म्हणाला.

 मी सर्वांकडे बघत स्मितहास्य केले, कानातील ‘earphone’ काढला आणि तोंडाने 'ये शाम मस्तानी, मदहोश किये जाय' गुणगुणत स्टेशनच्या दिशेने चालू लागलो . 

  

टिप्पण्या

  1. Nice
    Continue writing its benn long time since you have posted your story
    Well done trupti

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान ....अप्रतिम लिखाण...!!

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान लिखाण... अप्रतिम विषय... दर्जेदार व प्रभावी मांडणी...!!

    उत्तर द्याहटवा
  4. Chan lekhan aahe
    Tumche topics pan chan aahe
    I read your stories daily
    I have read all your stories twice or thrice

    उत्तर द्याहटवा
  5. Nice creation but you need to work on some punctuation

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

जादूची डायरी.... ✍