पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जादूची डायरी.... ✍

इमेज
  लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर   ए तनु , आता माझा नंबर ना ! तू कशी काय खेळतेस ? मी तनुच्या हातातील चिपी खेचत म्हणाले . "शरू , तुला चान्स दिला होता , तेव्हा तू पडली आणि आऊट झाली,"   तनु मला चिडून म्हणाली . " तेव्हा माझा पायात पाय अडकला आणि मी पडले , आऊट कशी काय झाली "? मी तनुला रागात विचारले . आमच्या दोघींच्या भांडणात , आता बाकीच्या मैत्रिणी पण सामील झाल्या . आमच्या भांडणाचा आवाज ऐकून , माझी आजी बाहेर आली . पोरींनो खेळता का भांडता ? तिचा आवाज ऐकून आम्हीं शांत झालो . आजी पुढे म्हणाली , पोरींनो हे तुमचे मजेचे दिवस खेळा , बागडा , मजा - मस्ती करा पण भांडू नका . उद्या मोठ्या होऊन , लग्न करून सासरी गेलात कि एकमेकींचे तोंड देखील दिसणार नाही , मग बालपणीचे दिवस आठवाल आणि एकमेकींना भेटायला तळमळाल , असे बोलून आजी घरात गेली . बाहुला - बाहुलीचे लग्न लावता लावता एक दिवस आपले पण लग्न होणार ,  या विचाराने आम्हीं साऱ्याजणी सुन्न झालो . दिवसामागून दिवस जात होते , शालेय जीवन संपवून , आम्हीं कॉलेजमध्ये प्रवेश केला होता . भांडणाची जागा आता समजूतदारपणाने घेतली ह