जमलं रे जमलं
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर ‘ शुभ मुहूर्त ’ या वधू - वर सूचक मंडळाने मुलामुलींना भेटता यावे , बोलता यावे यासाठी एका हॉलमध्ये ' पहाण्याचा ' कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी शारदाकाकू , त्यांचे यजमान आणि त्यांचा मुलगा राघव गेले होते . तेथे बरचसे पालक मुलामुलींसहीत आले होते , मंडळाचे कार्यकर्ते नोंदणी करून हॉलमध्ये पाठवत होते , काही कार्यकर्ते लोकांना बसवण्याची तसेच चहा - पाण्याची व्यवस्था पहात होते . राघवला हा कार्यक्रम नवीन नव्हता, कारण जवळपास दीड वर्ष तो अशा मंडळात जात होता पण अजून त्याच्या लग्नाचे सूर काही जुळत नव्हते . राघवने BCom, MBA केले आणि तो आता एका बँकेत काम करत होता . शारदकाकूंना राघव हे एकच अपत्य होते . कालपर्यंत स्वतःचे घर ही कल्पना त्याला माहित नव्हती, आज सकाळी मंडळामध्ये एका मुलीने तुम्हीं आईवडिलांबरोबर राहता पण, तुमचे स्वतःचे घर आहे का ? असा प्रश्न त्याला विचारला होता . थोड्यावेळाने तो दुसऱ्या मुलीला भेटला , ती जॉब करणारी होती , शिष्टाचाराला अनु...