चला, श्रीमंत होऊया ...! 💰

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आजकाल जिकडे पहावे तिकडे एकच ध्यास , श्रीमंत होण्याचा , मग राधाकाकू या ध्यासापासून कशा अलिप्त राहणार ? अहो ऐकताय ना ? नुसते कांदेपोहे खात बसू नका , मी काय म्हणते याचा विचार करा . " माझं तोंडाबरोबर डोकंपण काम करत आहे , तू बोल ", श्रीरंगराव , राधाकाकूंचे यजमान हसत म्हणाले . " तुमच्या sense organs चा ताळमेळ नसतो आणि तुम्हीं sixth sense ची गोष्ट बोलताय ", राधाकाकू चिडून म्हणाल्या . हे पाहून त्यांच्या मुलांनी म्हणजेच प्रतीक आणि प्राची यांनी नाश्ता उरकला . नाश्ता झाल्यावर श्रीरंगरावांनी , मुलांना त्यांच्या आईचा विचार सांगितला . त्यावर प्रतीक म्हणाला ," आई पुढच्यावर्षी माझे graduation पूर्ण होणार , मग मी नोकरीला लागेन , त्यानंतर थोडा खर्चाचा भार मी उचलीन ". हे ऐकून राधाकाकू म्हणाल्या ," प्रतीक तू जबाबदारी घ्यायची तयारी दाखवलीस , मला खूप बरे वाटले ". त...