चला, श्रीमंत होऊया ...! 💰

 

लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

        आजकाल जिकडे पहावे तिकडे एकच ध्यासश्रीमंत होण्याचामग राधाकाकू या ध्यासापासून कशा अलिप्त राहणार ?

अहो ऐकताय ना ? नुसते कांदेपोहे खात बसू नकामी काय म्हणते याचा विचार करा . 

"माझं तोंडाबरोबर डोकंपण काम करत आहेतू बोल", श्रीरंगरावराधाकाकूंचे यजमान हसत म्हणाले.

तुमच्या sense organs चा ताळमेळ नसतो आणि तुम्हीं sixth senseची गोष्ट बोलताय", राधाकाकू चिडून म्हणाल्याहे पाहून त्यांच्या मुलांनी म्हणजेच प्रतीक आणि प्राची यांनी नाश्ता उरकलानाश्ता झाल्यावर श्रीरंगरावांनीमुलांना त्यांच्या आईचा विचार सांगितला.

त्यावर प्रतीक म्हणाला," आई पुढच्यावर्षी माझे graduation पूर्ण होणारमग मी नोकरीला लागेनत्यानंतर थोडा खर्चाचा भार मी उचलीन ".

हे ऐकून राधाकाकू म्हणाल्या," प्रतीक तू जबाबदारी घ्यायची तयारी दाखवलीसमला खूप बरे वाटले". त्या पुढे म्हणाल्या ," आता तुम्हीं मोठे झालातप्राचीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचे लग्न नंतर तुझे लग्न आणि महागाई किती वाढली आहेठाऊक आहे ना ! सोनं  लाखाच्या घरात गेले आहे,  तुमच्या लग्नापर्यंत आणखी महाग होईल". "तुमच्या वडिलांची सरकारी नोकरी आहे पण पगार टेबलवरून घेतातखालून नाही , त्यामुळे इतरांसारखा मोठा फ्लॅटगाडी आपल्याकडे नाही आणि सकाळी तुम्ही बाहेर पडल्यावरदुपारी माझ्याकडे निवांत वेळ असतो म्हणून मी काहीतरी करायचे ठरवले आहे,” असे म्हणून राधाकाकू जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या .

भाजी जळाल्याचा वास घरभर पसरला तशी प्राची स्वयंपाकघरात धावत गेली . तिने चटकन भाजी खालचा गॅस बंद केलापातेल्यावरचे झाकण काढले , भाजी पूर्णपणे जळली होती आणि काकू खिडकीपाशी उभ्या राहून विचारात गढून गेल्या होत्या .

प्राची जोरात ओरडलीआईलक्ष कुठे तुझे ? सगळी भाजी जळली आता दुसरी भाजी बनवावी लागणार अशाने आपण श्रीमंत तर नाही पण गरीब नक्कीच होऊअसे बोलून ती तणतणत बाहेर गेली.

काकूंनी तिच्या बोलण्याकडे जराही लक्ष दिले नाही कारण दुपारी जेवतानात्यांना त्यांचा business plan सांगायचा होता .

जेवण तयार झालेत्यांनी ताटं वाढायला घेतलीमुलंनवरा सर्वजण जेवायला बसले . काकू बोलू लागल्या , श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत , पण ते सर्व मार्ग मला जमतील असे नाही . हल्ली माणसे शेअर मार्केट मधून पैसा कमावतातपण आपलं मध्यमवर्गीय कुटुंब त्यामुळे extra money आपल्याकडे नाहीत.

"आई आपल्याकडे जर extra money असतेतर तू धंदा करायचा विचार केला असता का ? श्रीमंत बायकांसारखी , तू kitty party , shopping ला गेली नसती का" ? प्राची हसून म्हणाली.

म्हणजे हा option – cut," प्रतीक म्हणाला.

घरगुती खानावळ चालू करूयाअसा विचार करत होते , पण हल्ली लोकांचे जिभेचे चोचले जास्त आहेत , त्यांना चटपटीत , वेगवेगळे पदार्थ हवे असतात , त्यामुळे एवढे पदार्थ बनवायचे आणि संपले नाही तर .....

"तसं तू जेवण बरं बनवतेस,” असे म्हणत श्रीरंगरावांनी डब्यातून एक पोळी ताटात घेतली.

"तुम्हीं फक्त नावं ठेवाकधी कौतुक करणार नाही बायकोचेबरं म्हणायचे आणि तिसरी पोळी ताटात घ्यायचीमला कळत नाही काबाजूचे शामराव बघा , बायकोच्या प्रत्येक गोष्टीला छान असेच म्हणतात , अगदी पाण्याचा ग्लास दिला तरीही "... काकू डोळयाला पदर लावत म्हणाल्या.

"अगंती पाणी पण बनवतेकमाल आहे तिचीआता पाणीटंचाईचा प्रश्न सुटला", श्रीरंगराव म्हणाले.

"फालतू विनोद करू नकात्यांचे बायकोवरचे प्रेम पहातिला जराही दुखवत नाहीत", काकू चिडून बोलल्या.

याला प्रेम नाहीभीती म्हणतात, " श्रीरंगराव हसत म्हणाले.

दोघांच्या भांडणाला आणखी रंग चढण्याअगोदर, प्राची चटकन म्हणाली,"हाही option- cut".

मी आता पन्नाशीकडे झुकलेली , त्यामुळे नोकरी मिळणे शक्यच नाही आणि या स्पर्धेच्या युगात तरुण मंडळीच्या समोर माझा काय निभाव लागणार ! काकू बोलल्या .

मग श्रीमंत होण्यासाठी तू काय करणार ? तिघांनी एका सुरात विचारले .

पाळणाघर चालू करूया , असा विचार केला आहे , no investment , only profit , काकू हसत बोलल्या .

 मुलांचे करून कंटाळली आहे , असे तू म्हणत होतीस , मग हा नवीन त्रास कशाला ? श्रीरंगराव नाराजीच्या सुरात बोललेते पुढे म्हणाले, "सुरवातीला फक्त ४ तास पाळणाघर चालू ठेव , तुला जमतंय का पहा ? लहान मुलांच्यापाठी धावपळ करावी लागते , आपली मुले आता मोठी झालीतत्यामुळे मुलांना सांभाळण्याची सवय तुला नाही".

एकटीला तुला जमेल काआई ? प्राचीने मध्येच विचारले.

"सुनंदामाझी मैत्रीण आणि आपल्याकडे काम करणारी मालती या दोघी मदत करणार आहेतत्यांना थोडे पैसे देणार आहेप्रत्येक मुलामागे ४०००/- rate ठरवला आहेकाकूंनी business plan जाहीर केला.

त्या पुढे म्हणाल्या, " तिघीजणी आहोतत्यामुळे आरामात ८ तास पाळणाघर चालवूतुम्हीं चिंता करू नका."

बरंअसे म्हणून त्यांचे यजमान निघून गेले.

धंद्याची advertise कशी करणार ? प्रतीकने विचारले

Social media चा जमाना आहे, Whatsapp group वर messsage पाठवला आहेअसे बोलून काकूंनी message दाखवला.

मुलांनी आईला All the best for your business , असे म्हणताच त्यांना आनंद झाला .

क्लासला जाताना प्राचीने वडिलांकडे १०० रुपये मागितले व ती म्हणाली, "बाबा आता थोडे दिवसच मागणार , आईचा business सुरु झाला की आईकडे मागेन", हे प्राचीचे बोलणे ऐकून श्रीरंगरावांनी राधाकडे पहिलेत्या गालातल्या गालात हसत होत्या .

पाळणाघर दोन दिवसांनी म्हणजेच१ जूनपासून सुरु होणार होते१ तारखेला सकाळी लवकर  उठूनकाकूंनी जेवण बनवले आणि announce केले कीआजपासून ९ ते ५ हा माझा business time असणारतरी या वेळेत मी कुठलेही दुसरे काम करणार नाही .

बरोबर नऊ वाजतापाच जणी मुलांना घेऊन आल्याराधाकाकू आणि सुनंदा त्यांच्या स्वागताला हजर होत्याकाही मुले रडत होती तर काही आईला बिलगत होतीकाकू त्यांना म्हणाल्या ," काही काळजी करू नकाआईप्रमाणे माया लावीनमलादेखील दोन मुले आहेत", असे बोलून त्यांनी मुलांच्या बॅग्स घेतल्या व त्यांना घरात नेले.

त्यांनी मुलांना खाऊ दिलागाणी म्हणून दाखवलीटीव्हीवर cartoon channel लावलेमुले हळूहळू रमू लागली . दोनपर्यंतचा वेळ मजेत गेलात्यानंतर मात्र त्या दोघी पेंगायला लागल्या कारण त्यांच्या वामकुक्षीची वेळ झाली होती. 'माणूस हा सवयीचा गुलाम आहे', असे म्हणतात ते काही खोटे नाहीकाकू हसत बोलल्यामग मुलांना गोष्टी सांगूनत्यांच्याबरोबर खेळ खेळून त्यांनी कशीबशी दुपार घालवली .

रात्री सर्वजण लवकर जेवले , राधाकाकू बेडवर आडव्या होताच झोपी गेल्याहे पाहून श्रीरंगरावांनी जाणले कीराधा खूप दमली आहेत्यांनी तिच्या अंगावर चादर पांघरली आणि लाईट बंद केली.

दुसरा दिवस उजाडलानेहमीप्रमाणे काकूंची सकाळची गडबड सुरु झालीत्या वारंवार घड्याळाकडे पहात होत्या३० वाजलेत अजून अर्धा तास बाकी आहे , दोन - तीन कामं पण बाकी आहेतनऊपर्यंत होऊन जातील ,असा मनात विचार करत असतानाच बेल वाजलीघाईघाईत त्यांनी दरवाजा उघडला , समोर तनय आणि त्याची आई उभे होते . तनयची आई म्हणाली ," मला आज ऑफिसला लवकर बोलावले आहेम्हणून... " बिचाऱ्या काकू काय बोलणार ! business मध्ये ओव्हरटाईम करावा लागतो याचा त्यांनी विचारच केला नव्हताबरंअसे म्हणत त्यांनी तनयला आत घेतले , टीव्ही चालू केला व त्याला म्हणाल्या ," शांत बस हं बाळ , आता तुझे मित्र खेळायला येतील , तोपर्यंत तू टीव्हीवर छोटा भीम पहा ", असे म्हणून त्या पुढील कामे करण्यासाठी आत गेल्या . तनयनेभीम लाडू खात आहेहे पाहून आपला डब्बा बॅगमधून बाहेर काढलाडब्बा उघडायला गेला तोच हातातून पडला व सर्व खाऊ जमिनीवर सांडलानेहमी टापटीप असणारे घरअस्ताव्यस्त होत आहेहे पाहून त्यांच्या यजमानांनी आणि मुलांनी घरातून पळ काढला .

मालतीने घरात येताच पसारा पहिलातश्या तिच्या कपाळावर आठ्या उमटल्याती काकूंना म्हणाली, "आता रोजच असा पसारा असणारमहिन्याचे २०००/- कमी आहेतमला २५००/- पाहिजेत". काकू तिच्याकडे आ वासून पाहू लागल्यादुसऱ्यादिवशीच पगार वाढ मागणारा कर्मचारी आपल्याकडे काम करत आहेहे पाहून त्या घाबरल्या .

दुसऱ्यादिवशी मुले जरा धीट बनली होतीसोफ्यावर चढकुशन फेकस्वयंपाकघरात जामनाला येईल तसे वागत होतीत्यांच्या पाठीमागे पळतापळता सुनंदा दमून गेली . ३ वाजले तरी मुले झोपायला तयार नव्हती,पण तिचे डोळे मात्र मिटू लागले होतेशेवटी ३४० ला पाहुणे घरी येणार आहेतअशी थाप ठोकून ती निघालीकाकूंना ठाऊक होतेसुनंदा खोटे बोलत आहे ,पण त्या हार मानणार नव्हत्यादेशात businessman असेच मोठे झाले नाहीतत्यांनादेखील पार्टनरने फसवले असेलअडचणीत साथ सोडली असेलपण त्यांनी न घाबरता प्रयत्न चालूच ठेवलेमला त्यांचा आदर्श घेतला पाहिजेपुढील १-२ वर्षातआईसारखी माया लावणारे पाळणाघर म्हणून माझे नाव प्रसिद्ध होईलआज ५ मुले आहेतउद्या ५० होतीलमग सुनंदाच कायआणखी दोन बायका कामाला ठेवीन , असा विचार करतानात्यांना perfume चा वास आलात्यांनी वळून पहिले तर रिया प्रतिकची perfume bottle घरभर spray करत होतीत्या रियाला पकडेपर्यंततिने अर्धी bottle संपवली . हे पाहून काकूंनी डोक्याला हात लावला . मागच्या आठवड्यात विकत आणली होती आणि आज निम्मीपहिल्या महिन्यात बहुतेक तोटाच दिसतोयत्या मनाशी म्हणाल्या .

त्यानंतर एकाला खाऊ , दुसऱ्याला पाणी , तिसऱ्याची मस्ती हे सर्व सांभाळताना त्यांची दमछाक झाली.

संध्याकाळी त्या थोड्या थकल्यासारख्या दिसल्या म्हणून श्रीरंगरावांनी जेवण बाहेरून मागवले .

"उगाच खर्च केलातप्राचीच्या मदतीने मी जेवण बनवले असतेअजून कमवायची सुरवात नाही तर गमवायला तयार", काकू नाराजीच्या सुरात म्हणाल्या.

अगंतू दमली आहेस म्हणून तुला आराम आणि मुलांनाही change मिळेल", ते म्हणाले.

तिसरा दिवस उजाडलाकाकू थोड्या घाबरल्या होत्याआज सुनंदा येईल नाकाल सर्व जबाबदारी माझ्यावर पडलीखूप दमायला झालेआज मालतीला जास्त वेळ थांबायला सांगतेपण तिने काल पगार २०००/- वरून २५०० /- केला नाहीतर आज ३०००/- करेल.
 बापरे! entrepreneur बनण्यापेक्षा employee बनणे सोपे असते का ? इतक्यात बेल वाजलीकाकूंनी दरवाजा उघडलामुले आनंदाने घरात आलीकाकूंनी घड्याळात पहिले९ वाजून २० मिनिटे झाली होतीम्हणजे सुनंदाने पाहुण्यांचा मुक्काम वाढला या कारणास्तव सुट्टी घेतली तर ! ती ६०००/- महिन्याला घेणार आहेमी तिचा एक दिवसाचा पगार कापणार आणि मालतीला देणार , गरज फक्त मालकाला नसते तर काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला असते बरोबरअसे मनाशी म्हणत काकूंनी तो विचार थांबवला आणि मुलांच्यात रमल्या .

दुपारी दोन मुलांचे एका खेळण्यावरून भांडण सुरु झालेअगदी कडाक्याचे भांडण झालेते पाहून काकूंना आश्चर्य वाटले , कुठे बरं शिकले असतील हे भांडण ? काकू मालतीला विचारू लागल्या.

त्यावर मालती म्हणाली," अजून शाळेत कुठे जातात ? घरीच आईवडिलांची भांडणे पहिली असतील "आणि दोघी हसू लागल्या५ नंतर मुले गेली तरी काकू पसारा आवरत होत्यामुलांना उचलून त्यांचे हात दुखत होतेपण गप्प, 'कष्टाविण फळ नाही'.

आज शुक्रवार,चौथा दिवससकाळपासून त्या energetic वाटत नव्हत्याते पाहून घरातील मंडळींनी आज डबा नकोअसे सांगून ते निघाले.

थोड्यावेळाने माझ्यासाठी मुगाची खिचडी करीनअसे मनाशी ठरवत काकू मुलांची वाट पाहू लागल्यानेहमीप्रमाणे मुले आलीत्यांच्याबरोबर गाणी गायलीखेळ खेळल्यामुलांनी डान्स केलादुपारी एक वाजतामुलांना त्यांचे डबे काढून दिलेकाकूंनी मुलांना मुगाची खिचडी व त्यावर साजूक तूप घालून खायला दिलेमुलांनी स्वतःचा डबा बाजूला ठेवूनते मिटक्या मारत खिचडी खाऊ लागलेआजी छानमस्तमुलांचे आनंदी चेहरे पाहून सुनंदा म्हणाली ," राधा प्रेमाने खायला दिलीस ना" ! काकू फक्त हसल्यापोटभर खिचडी खाल्यावर मुलांना झोप येऊ लागलीमुले झोपली हे पाहून त्या दोघी जरा आडव्या झाल्यासुनंदा काकूंना विचारू लागलीतुला माहेर-सासर ची इस्टेट मिळण्याचा काही योग आहे का ? काकू हसत म्हणाल्या ," माहेरच सुटत नाही आणि सासरच पचत नाहीअशी आमची परिस्थिती", दोघी हसू लागल्या आणि बोलता बोलता झोपल्याचारचे ठोके पडले तरी त्यांना जाग आली नाही .

इतक्यात धाडकन आवाज झालात्या दोघी दचकून उठल्यासमोर पहिले तरनील खुर्चीवर चढून शोकेसमधील शिंपल्यांची डॉल काढत असतानात्याच्या हातातून पडली व त्याचे तुकडे घरभर पसरले . प्राचीची लहानपणीची आठवणती संध्याकाळी घरी आल्यावर नक्कीच रागावणार ! काकू एक दीर्घ श्वास घेत बोलल्या. "आपली मुले असती तर एव्हाना दोन फटके दिले असतेनाही का राधा" ? सुनंदा म्हणाली.

तू मुलांना दुसऱ्या खोलीत घेऊन जातोपर्यंत मी शिंपल्यांचे तुकडे उचलतेकुणाच्या पायाला लागायला नको, " काकू सुनंदाला म्हणाल्याकाकू काळजीपूर्वक तुकडे गोळा करू लागल्यात्यांच्या डोळ्यासमोर प्राचीचा रडवेला चेहरा आलाप्राची पाच वर्षाची झाली तेव्हा अलिबागला फिरायला गेलो होतोतिकडची आठवण म्हणून तिला शिंपल्यांची डॉल घेतली होतीदहा वर्षतिने ती डॉल सांभाळून ठेवली होती आणि आज... काकू नाराज झाल्या,काही तुकडे शोकेस खाली गेले होतेते काढताना काकूंच्या कमरेला टेबलचे कॉर्नर जोरात लागलेआई गं ss त्या कळवळल्यासुनंदा धावत आलीतिने त्यांना उठायला मदत केलीत्यांच्या कमरेला मलम लावलेगरम पाण्याची पिशवी शेकायला आणून दिलीआजीला लागले हे पाहून मुले देखील शांत बसलीसुनंदाने काकूंसाठी चहा केलाकाकूंनी वेदनाशामक गोळी आणि चहा घेतलापालक आल्याबरोबर मुले निघून गेलीकाळजी घेअसे म्हणत सुनंदा देखील निघाली.

घरातील मंडळींना कमरेच्या त्रासाबद्दल जराही सांगायचे नाहीअसे काकूंनी मनाशी ठरवले . त्यांनी वेदना सहन करत कसाबसा स्वयंपाक बनवलात्यांचे यजमान घरी आल्यावरत्यांना चहा, बिस्किटे  खायला आणून दिली काकूंचा चेहरा पहाताचश्रीरंगरावांनी ताडले कीराधाला वेदना जाणवत आहेत.

रात्री जेवताना त्या फारशा बोलल्या नाहीतजेऊन झाल्यावर उठताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची कळ दिसलीते पाहून श्रीरंगराव बैचेन झालेती स्वतःहून काहीच सांगणार नाहीरात्र झाली आहे, उद्या सकाळी सुनंदाला फोन करून विचारूया आणि सुट्टी घेऊया असे ठरवत त्यांनी बेड तयार केलाझोपताना काकूंनी गुपचूप मलम लावले आणि डोक्यापर्यंत चादर घेऊन झोपी गेल्यापण सकाळी त्यांना उठताच येईनाआई गं , वेदनेने त्या तळमळत होत्या.

श्रीरंगरावांनी प्राचीला दवाखान्यात जाण्यासाठी गाडी बुक करायला सांगितलेप्राचीने mom health is not well, going to clinic असा message सुनंदाला पाठवलाडॉक्टरांनी x - ray काढायला सांगितलात्याबरोबर दोन blood test पण लिहून दिल्या. x -ray बघत dr म्हणाले," कमरेला मार लागला आहे , मागील काही दिवसात जड वस्तू उचलल्या आहात काशारीरिक श्रम देखील झाले आहेत असे वाटतेथोडी विश्रांती घ्यावस्तू उचलू नकाथोडे दिवस कमरेला बेल्ट लावात्यामुळे बरे वाटेलमलम आणि औषधे लिहून दिली आहेतते वेळेवर घ्या " .

दवाखान्यातून निघताना टॅक्सीत काकू डोळे मिटून बसल्या होत्यात्यांच्या डोळ्यासमोर दोन दिवसापूर्वीचे स्वप्न दिसू लागले,पाच वर्षात मी हजारांवरूनलाखांपर्यंत पोहचणार होते आणि.... पाचव्याच दिवशी माझे स्वप्न भंग झाले.

टॅक्सी दारासमोर उभी राहिलीकाकूंना यजमानांनी हात धरून घरात नेलेत्या खुर्चीवर बसल्याप्राचीने पाणी आणून दिलेतेवढ्यात प्रतीक आलाघरातील शांतता पाहून त्याने विचारलेभीम और उसकी टोली कहाँ हैं ?

प्राची म्हणाली," सब फुर्र हो गये भैया , बिझनेस चौपट हो गया ".

काकू कुठलीही प्रतिक्रिया न देता खिडकीबाहेर बघत होत्या .

इतक्यात दारावरची बेल वाजलीदारात एक बाई आपल्या लहान मुलीला घेऊन आली होतीश्रीरंगरावांनी आपण कोण ? असे विचारताच ती म्हणाली," येथे फुलपाखरू पाळणाघर आहे ना ! श्रीरंगरावांनी राधाकडे पाहिलेपण त्यांची नजर खिडकीबाहेर होती.

श्रीरंगराव त्या बाईला म्हणाले ," फुलपाखरू पाळणाघर माझी मिसेस चालवतेतिच्या कमरेला थोडा मार लागल्यामुळे एक आठवडा बंद आहेपुढच्या आठवड्यात सुरु होईल ".

ठीक आहेमी पुढच्या आठवड्यात येईनअसे म्हणून ती निघून गेलीकाकूंनी श्रीरंगरावांकडे आश्चर्याने पाहिलेमुले म्हणाली," बाबातुम्हीं काय म्हणालात ! पुन्हा चालू होईलचार दिवसात आमदनी अठन्नी खर्चा रुपयाअसे झाले आहे" .

श्रीरंगरावांनी त्यांना हाताने थांबवलेते पुढे म्हणाले," पाळणाघर चालवणेकेवळ श्रीमंत बनण्याचा मार्ग नव्हता तर तुमच्या आईला समाधानआनंद मिळवून देणारा मार्ग आहेपैश्याच्या बाबतीत बोलायचे तर नफा /तोटा या धंद्याच्या बाजू आहेतपण धंद्यासाठी प्रयत्न करणेही त्याहून मोठी गोष्ट आहे ".

श्रीरंगरावांचे बोलणे ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर हास्य उमटले , त्या म्हणाल्या ," किती छान बोललात तुम्हीं" !

"शेजारच्या शामरावांसारखे नाही का आई!" प्राची आणि प्रतीक हसून म्हणाले.

Click here to go back to themarathistory.com

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

आणि माझा . . . झाला