पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कारभारी .. लयभारी!

इमेज
   लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर          " शी !  काय boring आयुष्य आहे ,  no thrill! " लक्ष्मी रागाने म्हणाली .             " असं का म्हणता देवी ? तुमच्याकडे तर दैवीशक्ती आहे , मनात आणाल , ती वस्तू समोर , कामाची दगदग नाही की , जेवणाची गडबड नाही ,  आयुष्य कसं शांत ,  निवांत ," विष्णू हसत म्हणाले .      वस्तूंमुळे तर क्षणभर सुख , दुसऱ्या क्षणाला वस्तूंचा विसर पडतो देवा , जगाचा कारभार चालवण्याच्या निमित्त तुम्हीं सारखे बाहेर असता , कंटाळा येतो आम्हांला , निदान cooking मध्ये काही वेळ तरी जाईल , असे वाटते ," देवी  उदास मनाने बोलली . तुम्हांला कुठे माहित आहे cooking ची झंझट ? सकाळचा नाष्टा , डब्यातील मेनू , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहाबरोबर snacks आणि रात्रीचे पोटभर जेवण , मृत्युलोकातील बायकांना कुठली भाजी आणि कुठला छानसा पदार्थ करायचा याचीच चिंता जास्त असते ," देव म्हणाले . तुम्हांस काय ठाऊक ? तिने आश्चर्याने विचारले . " अगं , पूजा करताना तोंडाने स्तोत्र म्हणता...