अशी ही …... चिपका - चिपकवी
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर अहो ss हे काय! १०० रुपयांची नोट फाटकी आहे, अशी कशी घेतलीत? बघितले नाही का? आईच्या प्रश्नांचा बाबांवर भडिमार चालू झाला. बाबा ऑफिसमधून नुकतेच घरी आले होते. " अगं रिक्षावाल्याने दिली, त्याच्याकडे दुसरी १०० रुपयांची नोट नव्हती, मग काय करणार? शेवटी घेतली फाटकी नोट" बाबा म्हणाले. त्यावर आई म्हणाली, "तुम्हांला काय माहित? त्याच्याकडे दुसरी १०० रुपयांची नोट नव्हती ते! त्याने तुम्हांला मुद्दाम फाटकी नोट चिपकवली". "बँकेत देतेस का ती फाटकी नोट"? आजोबा म्हणाले. "बँकेत फाटकी नोट घेत नाहीत" आई नाराजीच्या स्वरात म्हणाली. रस्त्याच्या कॉर्नरला एक दुकान आहे, तो दुकानदार फाटक्या नोटा बदलून देतो, पण १०० रुपयांतील २० रुपये कापून घेईल आणि ८० रुपये परत करेल, बाबांनी आईला पर्याय सुचवला. " अरे, वा रे वा! २० रुपयांचे नुकसान का बरं!" आई क...