सेम टू सेम (Same to Same)
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
तिचे स्कूल घरापासून जवळच होते, नेण्या - आणण्याची जबाबदारी आजोबांनी घेतली होती, सकाळी ९ वाजता स्कूलला न्यायचे आणि ११ वाजता आणायचे. आजोबांनी स्वतःचे 'schedule' नातीच्या 'schedule' नुसार adjust केले होते. आज छोटी, छोटी मुले पहिल्यांदाच आईला सोडून स्कूलला आली होती. काही मुले रडत होती, काही मुले स्कूल नको म्हणून पळत होती तर काही दंगा मस्ती करत होती. टिचर्स मुलांना खाऊ देऊन, गाणी म्हणून तसेच colouring करायला लावून स्कूलमध्ये रमवण्याचा प्रयत्न करत होते. लहान मुलांचा आवडता छंद म्हणजे drawing आणि colouring, कागदावर वेड्या वाकड्या रेघा काढणे, गोलाकार, त्रिकोणाकार चेहरे काढणे, त्यावर आवडता कलर देणे, मग चेहरा गुलाबी असो वा पिवळा who cares! म्हणूनच की काय, श्रियाच्या स्कूलमध्ये दुसऱ्या आठवड्यात चित्रकलेची स्पर्धा ठेवली होती. घरी आल्यावर श्रियाने drawing च्या स्पर्धेबद्दल सांगितले, कुठले चित्र काढायचे? यावर घरात चर्चा सुरु झाली.
आजी म्हणाली - छानसा बॉल काढ, रंगीबेरंगी.
"नको,
बॉल नको आजी" श्रिया चे उत्तर.
आजोबा म्हणाले - छत्री काढते का ? नाहीतरी पावसाळा सुरु
आहे. तुझी छोटीशी छत्री, चित्र काढताना समोर ठेव म्हणजे झालं
.
बाबा म्हणाले - फूल काढ, सोपे आणि छान, गुलाबाचे
का कमळाचे, कुठले काढते? पण श्रियाचा topic काही ठरेना.
शेवटी आई म्हणाली - Ice cream चा cone काढ,
खूप वेळा
आईस्क्रिम खाल्यामुळे त्याचा आकार आणि रंग चांगलेच माहीत आहेत तुला, नाही का!
तशी श्रिया म्हणाली, "छे, छे इतकं कठीण चित्र मी काढणार नाही".
मग काय काढणार? आम्हीं सर्वांनी एकदम
विचारले. "मी 'फॅमिली चित्र' काढणार, आजी-आजोबा, आई-बाबा आणि मी, छान आहे ना idea! आत्याने कसं फॅमिली चित्र काढले
आहे, अगदी तसंच same to same",श्रिया म्हणाली.
श्रियाची लाडकी आत्या,
शालिनी
उर्फ शालू आत्या, एक नामवंत 'Artist'. त्यामुळे श्रियाचा पण एकच अट्टाहास 'मी देखील आत्यासारखी
artist होणार'. शालिनीने एक सुंदरसे फॅमिली चित्र
काढले होते, ते चित्र सासऱ्यांनी फ्रेम करून हॉलमध्ये भितींवर
लावले होते. सासरे अभिमानाने सांगत, माझ्या शालूच्या हातात जादू आहे, तिने हातात पेन्सिल पकडली की, कागदावर छानसं चित्र उमटलेच म्हणून समजा.
श्रियाचा 'फॅमिली चित्र' हा topic आम्हांला जरा कठीणच वाटत होता. बाबा हसत म्हणाले "श्रिया, काढायला जायचा मारुती आणि निघायचा उंदीर असे नको व्हायला". पण ती मात्र जिद्दीने
पेटली होती, त्यामुळे काही केल्या 'फॅमिली
चित्र' हा topic बदलेना.
दुसऱ्या दिवसापासून चित्रकलेसाठी लागणारे कागद, पेन्सिल, रबर, स्केचपेन, क्रेयॉन हे सामान हॉलमध्ये अस्ताव्यस्त पसरू लागले. भितींवरील 'फॅमिली चित्र' खाली आले होते. कधी श्रिया सोफ्यावर बसून चित्र काढत असे तर कधी जमिनीवर झोपून चित्र काढत असे. आत्याने काढलेले चित्र डोळ्यासमोर ठेऊन कागदावर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करी, अधून-मधून ती सांगत असे, आजोबा हे चित्र छान नाही, हा पेपर टाकून दया, दुसरा पेपर दया, बिचारे आजोबा काय करणार! नातीच्या मदतीला हजर असायचे. एव्हाना १५ ते १६ पेपर कोपऱ्यात जाऊन बसले होते, पेन्सिल शार्प करून छोट्या झाल्या होत्या, स्केचपेननी हात रंगले होते, क्रेयॉन्सचे कलर नुसते कागदावरच नाहीतर जमिनीवर पण वापरले होते. दमली असेल माझी नात, तिला भूक लागली असेल, असे म्हणून आजी मधून, मधून बिस्किट, फळे आणि चॉकलेट भरवत होती.
प्रॅक्टिस करता करता आठवडा कसा संपला कळलेच नाही. स्पर्धेचा दिवस उगवला, श्रियाची स्वारी खुशीत होती. आजी म्हणाली, "देवाला नमस्कार कर आणि सांग, माझ्याकडून फॅमिली चित्र काढून घे, अगदी आत्याच्या चित्रासारखे same to same". श्रियाने मानेनेच होकार
दिला. आज माझ्या मनात
देखील थोडीशी भिती निर्माण झाली होती, जर तिला चांगले चित्र काढता आले नाही तर .... ती हिरमुसेल, रडेल, नको नको देवा! माझ्या राणीला नाराज करू नको, मदत कर, please असे म्हणून मी
देखील देवाला नकळत हात जोडले. आजी सारखी हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होती पण आजोबा मात्र अडगळीच्या खोलीत काहीतरी खुडबूड करत
होते. ११ वाजायला आले तसे ते स्कूलला गेले, तिला घेऊन घरी आले, पण नेहमी बडबडणारी श्रिया आज काहीशी गप्प होती, गालाचा फुगा फुगला होता. "काय झालं? चित्र काढलंस ना!" आजीने विचारले. ती काहीच बोलेना. आजी म्हणाली, "अगं स्पर्धेत भाग घेणे हेच खरं महत्वाचे, बक्षीस मिळणार नाही, म्हणून
रडायचे नाही बाळ". तरीही श्रिया हुप्प. आज माझ्या
चिमणीचा चिवचिवाट बंद होता, काय करावे, म्हणजे चिवचिवाट पुन्हा सुरु होईल, काहीच सुचेना.
तेवढ्यात आजोबांनी अडगळीच्या खोलीतून एक कागद आणला आणि श्रिया समोर धरला, तो कागद पहाताच तिची कळी खुलली, तिने आपल्या बॅगेतून
चित्राचा कागद काढला व दोन्ही कागद बघून आनंदाने ओरडली 'same to same'. आम्हीं दोघी गोंधळलो, एवढा वेळ प्रयत्न करून
न खुलणारी कळी, एका कागदामुळे खुलली, काय बरं जादू आहे त्या
कागदात! मी विचारले.
त्यावर सासरे म्हणाले, "शालू 'kindergarten' मध्ये होती, तेव्हा तिने हे फॅमिली चित्र काढले, तिचे पहिलेच चित्र म्हणून
मी आवडीने जपून ठेवले". आज श्रियाची पहिलीच
स्पर्धा आणि तिने देखील शालू सारखे फॅमिली
चित्र काढले आहे, बघा तुम्हीं असे म्हणून दोन्ही चित्रे आम्हांला बघायला दिली. दोन्हीं चित्रांत
गोलाकार डोकं, त्रिकोणी शरीर आणि काडी सारखे पाय असणारी माणसे होती, दोन्हीं चित्रांत
फारच साम्य दिसत होते .
आजी हसून म्हणाली, " श्रियाचे 'same to same' चित्र, हे मिशन यशस्वी झाले तर!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा