मला पंख आले तर... !
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
आई आई ..... अग मी उडत आहे, मला पकड ना ! अग मी दिवाणखान्यातून उडत उडत गच्चीवर आले . अय्या गच्चीतल्या झाडांवर किती छान फुलपाखरे बसली आहेत ,त्यांचे रंग किती सुंदर आहेत; पिवळा ,निळा ,गुलाबी व त्यावर काळे ठिपके अगदी माझ्या फ्रॉकसारखे . अरे थांबा, मी पण आले तुमच्याबरोबर उडायला, वा ! किती सुंदर बाग आहे ,फुलांचा सुगंध दरवळत आहे, तऱ्हेतऱ्हेची फळझाडे पण आहेत, फुलपाखरे झाडांवर नुसती भिरभिरत आहेत ,माझ्याकडे तर मुळीच लक्ष नाही त्यांचे ;चालली मी उडत .
पक्ष्यांचा
किलबिलाट ऐकू येतोय . या
निळ्याभोर आकाशात पक्षी किती स्वछंदपणे उडत आहेत, एकमेकांशी
हितगुज करत आहेत, आई
इथे 'नो ट्रॅफिक'. मुले वेगवेगळ्या आकाराचे पतंग उडवत आहेत
त्रिकोणी ,चौकोनी ,अंडाकृती आणि काही पतंगांना तर शेपट्या पण
आहेत . अरेरे !काय झाले ?या
पक्षाच्या पायाला दुखापत झाली ,रक्त
आले ,कशामुळे ? 'मांजा'
बाबा नेहमी सांगतात "सुती धाग्याचा मांजा वापरा ,कृत्रिम धाग्याचा मांजा वापरू नका " तो पक्ष्यांसाठी हानिकारक असतो ,माणसांना, मुलांना
देखील इजा होऊ शकते .
"सुती धाग्याचा मांजाच सर्वात चांगला असतो "
अरे; बाबा
स्कुटरवरून येताना दिसत आहेत ,माझ्यासाठी
केक आणणार आहेत ,पण
मी आता घरी कशी जाऊ? मी
तर उडत आहे . आई
आई ..... इतक्यात धाडकन आवाज झाला ,मी हळूच डोळे उघडले तर आई समोर उभी होती .मी आपली बापडी पंख चाचपडत होते, तशी ती हसून म्हणाली "राणीसाहेब स्वप्न पहात होत्या तर !"मी गालात खुदकन हसली आणि आईच्या मिठीत
शिरले .
👍🙏
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवा👌👍
उत्तर द्याहटवाThank you
हटवा