अन्नदेवता ..... नमो नमः 🙏
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर हे गं काय मनू, आजपण डबा संपवला नाहीस, आज तर तुझ्या आवडीचे सँडविच दिले होते. अगं, आई डबा संपवणारच होते, पण काय करू? लंच -ब्रेक संपला. रोज जेवताना ताटात अन्न टाकते, डबा संपवत नाही, हे मला अजिबात आवडत नाही, अन्नदेवतेचा अपमान होतो, शालिनीची बडबड चालू होती आणि मनू आजीच्या पाठीमागे लपली होती. मनू म्हणजे, मनाली जोशी, Sr. Kg मध्ये शिकणारी. एकुलती एक नात, त्यामुळे मनू आजी-आजोबांच्या गळ्यातील ताईत होती. कधीतरी शालिनीला वाटायचं, मनूचे चुकले की, ओरडावे पण आजी-आजोबा तिची ढाल बनायचे, त्यामुळे तिला गप्प रहावे लागे. काय करावे बरं? असा विचार करता करता शालिनीने बेडवर अंग टाकले, इतक्यात तिच्या मनात एक छानसा विचार चमकला, तशी ती खुदकन स्वतःशीच हसली आणि निद्रादेवीच्या आधीन झाली. दुसरा दिवस उजाडला. शालिनीचे उठणे, घर आवरणे, शरद आणि मनू साठी डबा बनवणे, सासू-सासऱ्यांसाठी चहा -नाष्टा तयार करणे, सारे काही नेहमीप्रमाणे सुरु झाले. आजी-आजोबांनी मनूला उठवून शा...