मी मोठा कि छोटा .... ? 🤔
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
उद्या सुट्टी , शाळेला बुट्टी म्हणत तो आई
- बाबांच्या मध्ये येऊन झोपला . निहार , निहार . चल माझ्याबरोबर , त्याला वाटले राजू खेळायला बोलवायला आला , तो डोळे चोळून बघू
लागला पण राजू काही दिसेना . "चल माझ्याबरोबर" एवढेच शब्द त्याच्या कानावर पडले , तो मुकाट्याने चालू लागला , एव्हाना त्याची झोप पुरती उडाली होती , आपण कुठेतरी
चाललोय याची त्याला जाणीव होऊ लागली , तो चक्क इंद्राच्या दरबारात पोहचला होता . इंद्राने
विचारले " तुझ्या बाजूला कोण उभे आहे " तो हसत म्हणाला " नारदमुनी
" अरे वा ! तुला माहीत आहे तर , हुशार आहेस . देवा , मी रोज आजी -आजोबांबरोबर टिव्हीवर 'Serial ' बघतो त्यात असेच नारदमुनी आहेत , 'मस्तकावर फुलांची माळ आणि हातात वीणा ', नारायण , नारायण सर्व देव
हसू लागले .
निहार, तू आईला म्हणतो ना कि मी मोठा झालो , मला काही सांगू नको , अरे बापरे ! देवा तू देव्हाऱ्यात बसून सारं ऐकले का ? देवाने स्मितहास्य
केले . आता, मी तुझी
परिक्षा घेणार, तुला पाच प्रश्न
विचारणार , मग ठरवू ' तू छोटा कि मोठा
' , खरंतर मी खूपच घाबरलो
होतो पण उसनं अवसान आणून म्हणालो " मी
तयार आहे " .
पहिला
प्रश्न इंद्राने विचारला - तुझ्या आईला काय आवडते ?
मी उत्तर
दिले - साडी , दागिने , ड्रेस , मेकअप किट.
इंद्र म्हणाला - चूक . तिला सर्वात जास्त
तू आवडतोस .
दुसरा प्रश्न रंभेने विचारला - तुझ्या बाबांना काय खायला आवडते ?
माझे उत्तर
-वडापाव , समोसा , पाव-भाजी आणि पिझ्झा .
रंभा म्हणाली - चूक . जे तुला आवडते तेच त्यांना आवडते .
तिसरा प्रश्न देवीने विचारला - तुझ्या आजोबांना सर्वात
जास्त कोणाचा आवाज आवडतो ?
माझे उत्तर - सुरेश वाडकर , लता दीदी , आशा भोसले
.
देवी म्हणाली - चूक . तुझा गोड आवाज त्यांना आवडतो . तू 'नाच रे मोरा ' गाणं म्हणतो तेव्हा ते किती छान
डोलतात .
चौथा प्रश्न मेनकेने विचारला - तुझ्या आजीला केव्हा
आनंद होतो ?
एकदम सोपे उत्तर आहे , मी म्हणालो . जेव्हा आजोबा
तिच्या आवडीचे ice-cream आणतात तेव्हा ती खूप खुश असते .
मेनका म्हणाली - चूक . जेव्हा तू
तिच्या गळ्याला मिठी मारतो आणि तिचा गोड पापा घेतोस ना तेव्हा तिला सगळ्यात
जास्त आनंद होतो .
आता शेवटचा प्रश्न -तुला सगळ्यात जास्त काय खायला
आवडते ?
ह्या प्रश्नाचे उत्तर आईलाच माहित आहे , ती रोज
डब्यात छान ,छान खाऊ देते आणि मी आवडीने खातो
. तशी इंद्राने खिशातून 'मोठी list ' बाहेर काढली , बापरे , एवढे
सारे पदार्थ आई माझ्यासाठी बनवते , मी थक्कच झालो आणि "हि list तुझ्या
आईच्या डोक्यात असते" , इंद्र म्हणाला. नंतर मला
एक ‘certificate’ देण्यात आले , "मी
छोटा आहे असेच लिहिले आहे ना ह्यात ", देवा , तू तर ' राईटच' आहे . पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, आपल्यातील हि गंमत तू कुणालाच सांगायची नाही , इंद्राने सांगितले . देवा
, कुठल्या तोंडाने सांगू की , मी 'fail ' झालो पण मी आता घरी कसा जाऊ ? देवाने नारदांना खूण केली
, आत्ता सोडतो देवा , नारद म्हणाले .
निहार, अरे
माझं बोट का बरं पकडून ठेवलंस , सकाळ झाली , मला उठायचे आहे . आई , माझ्या हातात
'certificate
' आहे , कसले 'certificate ' नयना विचारू लागली , तसे मी खाडकन डोळे उघडले , लक्षात आले कि ' देवाची
गंमत सांगायची नाही कुणाला '.
आईच्या गालावर हात फिरवत तिला म्हणालो " आई , मी तुझा बाबू अजून छोटाच आहे , तुझे सगळे ऐकीन हं ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा