उद्या, कधी येणार ...... ?

 

 लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर

       जून महिना नुकताच सुरु झाला होता , पावसाच्या सरी अधून-मधून बरसत होत्या , वातावरणात मस्त गारवा होता . हातात गरमागरम चहाचा कप घेतला आणि गॅलरीतील झोपाळयावर येऊन बसले. ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता आणि सोबत आल्याचा चहा वाह ! मन अगदी उल्हसित झाले होते . झोपाळ्याच्या झुल्यावर माझे मन बालपणीच्या आठवणीत रममाण झाले होते , मधूनच गालावर हास्य फुलत होते.

       काय करतेस गं आई ? तिच्या या वाक्याने मी भानावर आले , "कोमल" माझी लेक , अगदी नावाप्रमाणेच आहे, तिचे ते हळुवारपणे बोलणे , फुलपाखरासारखे बागडणे , हसतांना गालावरची खुललेली खळी , मनाला भुरळ घालते पण…. तिची एक वाईट सवय आहे ती म्हणजे कुठलेही काम सांगा, " उद्या करीन " हे तिचे उत्तर . अगं, तुझा हा 'उद्या' येणार तरी कधी ?आमच्या या प्रश्नावर " उद्या तर रोजच येतो " असे बोलून ती पळ काढायची". तिचा हा "उद्या " मला घाबरवतो कारण आज ती "Senior K. G. "मध्ये आहे कालांतराने जर म्हणाली " आई , अभ्यास नां उद्या करिन", तर आली का पंचाईत ?

      कारण 'आयुष्यात उद्या कधीच येत नाही' त्यामुळे "तिचा हा उद्याचा प्रश्न मला आजचं सोडवला पाहिजे". काय करावे बरं ! असा मी विचार करता करता मनात एक "छानशी idea" डोकावली तसा चहाचा शेवटचा घोट मस्त मिटक्या मारत घेतला. 'पाऊस आणि गरमागरम भजी' हे समीकरण काहीसे आपल्या अंगवळणी पडलंय म्हणून घरातल्या सर्वांची भजीची फर्माईश पूर्ण करण्यासाठी मी किचनकडे वळली . कोमल लगबगीने माझ्या पाठीमागे आली आणि आई sss,आई तुला माहित आहे ना , पुढच्या महिन्यात कोणता 'festival' आहे ? "होय गं राणी, तुझा birthday " मी म्हणाले. तशी ती खुदकन हसली आणि खेळायला पळाली.

     कोमलचा birthday म्हणजे " जणू काही एखादा सण ". सणालाही लाजवेल अशी सजावट , दिव्यांची रोषणाई आमच्या घरात असते , निरनिराळ्या रंगांचे फुगे , वेगवेगळे cartoon sticker भिंतींवर लावलेले असतात ,'कोमलचे गिफ्ट्स' याची एक यादीच असते, आजी -आजोबांची तर नुसती धावपळ चालू असते . 'Birthday wish' साठी नातेवाईकांचे फोन , friends बरोबर celebration... नुसती धमाल असते .

    हा, हा म्हणता तो दिवस उजाडला , कोमल, आज सकाळी जरा लवकरच उठली पण घरात कमालीची शांतता , birthday ची तयारी नाही हे पाहून ती धास्तावली, धावत किचनमध्ये आली. तिला बघताच मी जवळ घेतले, माझ्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या असे बोलून तिचा गोड पापा घेतला आणि मोठं चॉकलेट दिले , तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले . आई , मैत्रिणींना द्यायला 'chocolates' आणली आहेत ना ?कोमलचा प्रश्न. अरे बापरे ! आणायची राहूनच गेली , जाऊ दे ; उद्या देऊया , त्यात काय ! माझ्या या उत्तरावर तिचा चेहरा हिरमुसला . आई फ्रेंड्स आज 'chocolates' मागणार , उद्या देऊन काय उपयोग ? असे बोलून तिच्या गालाचा फुगा फुगला.

      तिच्या स्कूल ची वेळ झाली ,तेव्हा तिने नवीन ड्रेस साठी हट्ट धरला ."अगं, नवीन ड्रेस शिवून तयार झाला नाही" असे टेलर म्हणाले. उद्या घेऊन येईन हं, मी म्हणाले. उद्या ड्रेस चा काय उपयोग ? आज नवीन ड्रेस घातला तर स्कूल मध्ये सगळ्यांना कळणार कि, कोमलचा 'birthday' आहे, मग मला सगळे 'wish ' करणार , टीचर 'birthday song ' बोलणार , खूप मज्जा येते आई . मी, या दिवसाची आतुरतेने वाट बघते आणि तू म्हणते उद्या ड्रेस मिळेल , मी नाही स्कूल ला जाणार असे बोलून चिडून कोपऱ्यात बसली . .

     मी कशीबशी समजूत घालून तिला स्कूल ला पाठवून दिले . कोमल संध्याकाळी स्कूल मधून घरी आली , बघते तर काय ! 'No decoration , no party , no gifts ' आता मात्र ती रडवेली झाली . 'उद्या साजरा करूया, तुझा birthday ", तुला उद्याचा दिवस खूप आवडतो ना ! आम्हीं म्हणालो . माझा जन्म आज झाला तर साजरा पण आजच करायला पाहिजे नां !उद्या तर मीनूचा birthday आहे , असे म्हणून कोमल रडू लागली .

     आजोबांनी चटकन जवळ घेतले , आता तुला समजले ना "आजचे महत्व ". "जसे आज birthday तर आजचं celebration" तसेच "आज सांगितलेले काम आजच केले पाहिजे", उद्या करून चालणार नाही . सॉरी आजोबा , आता 'मी पुन्हा कधीही उद्याची वाट पाहणार नाही , आजचे काम आजच करणार' कोमल रडवेल्या आवाजात बोलू लागली . पण आता बोलून काय उपयोग , रात्र झाली , माझा birthday संपला असे बोलून कोमल तिच्या खोलीत जायला निघाली .

      असा -कसा संपेल माझ्या 'राणीचा birthday' सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजेच , असे बोलून आजीने हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला , तसे तिचे सारे फ्रेंड्स जोरात ओरडले " Happy birthday Komal "


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जमलं रे जमलं

An Evening in SwargLok

जादूची डायरी.... ✍