मी पाहिलेले .... भू sss त
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर आज परिक्षेचा रिझल्ट लागला , मी सहावीतून सातवीत गेलो , आता मला स्कूलमध्ये NCC हा विषय येणार , "खाकी रंगाचा युनिफॉर्म , शूज , कॅप वा! मस्त आणि त्या युनिफॉर्म मध्ये मी शूरवीरासारखा दिसणार" मी म्हणालो. त्यावर बाबा म्हणाले " अहो राजे, लाईट गेली कि कळेलच कोण शूरवीर आहे ते ! घरातील सर्वजण खो -खो हसू लागले. तेवढ्यात माझा मित्र राजू आला . राजू म्हणाला " माझे काका कोकणातून आले आहेत , ते आम्हांला छान छान गोष्टी सांगणार आहेत " तू पण येतोस का ऐकायला ? मी घड्याळाकडे बघितले , रात्रीचे १० वाजले होते . अरे , काळजी करू नको , १ तासात गोष्ट संपेल , राजू म्हणाला . मी मनात विचार केला , १ तास म्हणजे ११ वाजतील , म्हणजे आणखी रात्र होणार. माझा चेहरा बघून बाबा म्हणाले " मी येऊ का तुला न्यायला " ? आई किचन मधून बोलली " अहो , आता तर तो म्हणाला नां , कि मी शूरवीर आहे ते ! मग तुमचा विश्वास नाही बसत का ? आईच्या या बोलण्यावर मला आता जायलाच हवे होते . ...