स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर
पण दुर्देवाने दुसऱ्या दिवसापासून मला ताप
येऊ लागला , साहजिकच स्कूल ला जाणे बंद झाले. डॉक्टरांनी " viral
fever आहे, ३ ते ४
दिवसांत बरे वाटेल मग स्कूल ला जाऊ शकशील "असे सांगितले , म्हणजे .... माझी 'practice' संपली , मला आता कार्यक्रमात 'chance' मिळणार नाही, मी रडवेला होऊन बोललो
. तीन दिवसांनी ताप गेला , पण अशक्तपणामुळे आणखी चार दिवस मला घरी आराम करावा लागला
. 'स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तवानिमित्त ' स्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांत, मी नाही याची माझ्या मनाला खंत लागून राहिली .
१५ ऑगस्टला सकाळी सात वाजता मी स्कूलला पोहचलो . केशरी , पांढऱ्या आणि हिरव्या रंगांच्या पताका सर्वत्र लावण्यात आल्या होत्या , स्वातंत्रवीरांचे फोटो भिंतींवर झळकत होते , शिक्षकवर्गाने सफेद रंगाचा पोशाख परिधान केला होता , सर्वत्र आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण होते " जणू काही, भारताला काल स्वातंत्र मिळाले आणि आज ते आम्हीं अभिमानाने साजरे करीत आहोत , असे भासत होते. स्टेजवर मान्यवरांसाठी, प्रिंसिपल यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली होती व आम्हां मुलांसाठी ग्राऊंडवर खुर्च्यांची व्यवस्था केली होती . कार्यक्रमांत भाग घेणाऱ्या मुलां -मुलींनी वेगवेगळे पोशाख परिधान केले होते , कोणी भारतमाता बनले होते तर कोणी ' स्वातंत्रवीर बनले होते , कुणी सैनिक बनले होते तर कुणी आंदोलनकर्ते बनले होते . प्रिंसिपल ' डॉ.जोशी ' यांनी chief guest ' कर्नल सिंग ' यांना स्टेजवर आमंत्रित केले . 'कर्नल सिंग' यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला , त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु झाले , एकामागून एक दर्जेदार कार्यक्रम होत होते , टाळ्यांचा कडकडाट होत होता . शेवटी स्वातंत्र संग्रामच्या चळवळीचे नाट्यरूप सादर करण्यात आले, "चले जावो " च्या घोषणा आंदोलनकर्ते देत होते, कार्यक्रम बघता बघता आम्हीं मुले इतकी भारावून गेलो कि, नाटकातल्या पात्रांबरोबर आम्हीदेखील ' चले जावो ' च्या घोषणा देऊ लागलो, सारा परिसर घोषणांनी दुमदुमत होता .
त्यानंतर "कर्नल सिंग यांनी युद्ध भूमीवर
गाजवलेल्या पराक्रमांची माहिती" साने
टिचर यांनी आम्हांला करून दिली, तसेच त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. सर्वप्रथम
त्यांनी आम्हांला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या , आज भारताने स्वातंत्र्याची
७५ वर्षे पूर्ण केली आहेत , म्हणून आपण अमृत महोस्तव साजरा करीत आहोत . स्वातंत्रवीरांनी
देशाला वाचविण्यासाठी जिवाचे रान केले होते . मागील ७५ वर्षात भारताने केलेली धडपड , प्रयत्न सर्वांना ज्ञात आहे.
आज आपला देश दिग्गज देशांच्या यादीत स्थान मिळवत आहे. भारताने जवळपास सर्वच क्षेत्रात
आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी २५ वर्षानंतर , भारत स्वातंत्र्याचा शताब्दी महोस्तव साजरा करेल , त्यावेळी तुमच्या
'स्वप्नातील भारत' कसा असावा याबद्दलचे कोणी वर्णन करेल काय ! सर्वत्र शांतता पसरली …..भारतमातेला वंदन करून मी
बोलण्यासाठी उभा राहिलो . मान्यवरांना अभिवादन करून मी बोलायला सुरवात केली.
स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत यामध्ये बरेच महत्वपूर्ण बदल झालेले दिसून येतात. आपल्या देशाची प्रगती हि निश्चितच वाखाणण्याजोगी आहे , तरीही काही मुद्द्यांवर आपण विचार केला पाहिजे असे मला मनापासून वाटते .
१) साक्षर भारत :- ' साक्षरता अभियान ' हा उपक्रम,भारतात सुरु होऊन आज बरेच वर्षे झाली आहेत. पुढील २५ वर्षांत, हा उपक्रम पूर्णत्वाला गेला पाहिजे .पण साक्षरता हि केवळ वाचण्या -लिहिण्या पुरती नसावी तर चांगले -वाईट विचार समजण्यासाठी हवी आहे , वैचारिक पातळी वाढवण्यासाठी साक्षरता हवी आहे .
२) लोकसंख्या नियंत्रण :- 'लोकसंख्येच्या भस्मासुरामुळे'
आज आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे उदा . पाण्याचा प्रश्न , जागेचा प्रश्न , अन्न
-धान्यांची भविष्यात चणचण, पर्यावरणाचा ऱ्हास
.
" हम दो , हमारे
दो " हि घोषणा केवळ कागदोपत्री राहिली आहे .
मागील काही वर्षांपासून लोकसंख्येचे दुष्परिणाम आपण बघत आहोत उदा . वाढती बेरोजगारी,
आर्थिक चणचण, अति रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय
सेवा मिळताना होणारा विलंब. 'छोटे कुटुंब -
सुखी कुटुंब' हि भावना समाजात रुजली पाहिजे, त्याचे फायदे लोकांच्या निदर्शनास आणून
दिले पाहिजेत.
३) कचरा नियोजन :- आज आपल्याकडे दिवसागणिक हजारो टनांनी कचरा निर्माण होत आहे . घरातील, सुका कचरा - ओला कचरा वेगवेगळा करून टाकावा यासाठी शासन जनतेला वेळोवेळी आवाहन करत असते . 'कचरा निर्मूलन' हि एक गंभीर समस्या झाली आहे. या समस्येवर आपल्याला तोडगा काढला पाहिजे नाहीतर भविष्यात मातीच्या डोंगरांऐवजी कचऱ्याचे डोंगर दिसतील , त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल . स्वातंत्र्याच्या चळवळीत जनतेने जसा उस्फूर्तपणे भाग घेऊन चळवळ यशस्वी केली होती तशीच स्वच्छतेची मोहीम आपण सर्वांना आता राबवायची आहे . आपले घर -स्वच्छ , परिसर -स्वच्छ मग गाव -स्वच्छ नंतर शहर -स्वच्छ आणि शेवटी देश -स्वच्छ .
समर्थ रामदास स्वामी सांगतात " केल्याने होत
आहे रे आधी केलेचि पाहिजे ".
मग तुम्हीं बघालच , आपला देश आरशासारखा स्वच्छ आणि
लखलखीत होईल.
४) भ्रष्टचाराची किड :- काळाच्या ओघात आपण स्वातंत्रवीरांच्या
बलिदानाला विसरलो . " जहाँ, डाल, डाल पर सोने कि चिडियाँ करती है बसेरा , वो भारत
देश है मेरा", असे म्हणता म्हणता आपण आपल्या देशालाच पोखरायला निघालो आहोत . देशाच्या प्रगतीसाठी घेतलेले
निर्णय वेळेत पूर्ण होत नाही . स्वतःला जनतेचे रक्षक म्हणवणारे , आता भक्षक बनले आहेत
. मागील २ वर्ष 'covid ' या महामारीने केवळ भारतालाच नाही तर
संपूर्ण जगाला व्यापले होते . आपण हळू हळू त्या महामारीतून बाहेर पडत आहोत पण भ्रष्टचाराची
किड आपल्या देशातून काही केल्या नष्ट होत नाही.
हरित क्रांती , तंत्रज्ञान क्षेत्रात , क्रिडा क्षेत्रात आपला देश वेगाने घोडदौड करीत आहे . देशाच्या 'शताब्दी सोहळ्यापर्यंत' आपल्या सर्वांना ' भारत ' खऱ्या अर्थाने सुजलाम -सुफलाम बनवायचा आहे . मग त्या स्वातंत्र वीरांना खरीखुरी श्रदांजली मिळेल . शेवटी 'भारत माता कि जय' असे बोलून मी माझे भाषण संपवले .
पटांगण टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले होते. साने टिचर , आमच्या ' grade teacher ' यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते . भारत देशाच्या प्रगतीसाठी, तू आपले योगदान देशील याबद्दल मला पूर्ण खात्री आहे , असे बोलून त्यांनी माझी पाठ थोपटली .
स्वातंत्र्याच्या 'अमृत महोस्तव' दिना निमित्त
'देवाने' मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी देवाचे मनोमन आभार मानले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा