स्वच्छता....... एक सामाजिक उपक्रम
लेखिका : सौ. तृप्ती पाडळकर चौथीचा वर्ग चालू आहे, तिसरा सायन्सचा तास सुरु होणार, भोळे बाई येतील म्हणून मुलामुलींनी पुस्तके, वह्या बेंचवर काढून ठेवली. भोळे बाई म्हणजे कडक शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा त्यामुळे वर्गात बाईंचा दरारा असायचा. इतक्यात शिपाई वर्गात आला, भोळे बाई आज आल्या नाहीत, पिरियड ऑफ आहे, असे सांगून निघून गेला. व्वा! एकच गलका, ग्राउंड वर जाऊया का? काय काय खेळूया? खो-खो, फुटबॉल, पकडा-पकडी, मुलांचे प्लॅनींग सुरु झाले. एवढ्यात ताईसारखी दिसणारी मुलगी वर्गात आली, "आज मी तुमचा सायन्सचा तास घेणार आहे", ती म्हणाली. आमचे चेहरे हिरमुसले. तशी ती हसत म्हणाली, "घाबरू नका, अभ्यास घेणार नाही , एक छानशी गोष्ट सांगणार आहे, खेळ नाही तर निदान गोष्ट तरी चालेल ना"! तिने विचारले. हो, एका सुरात आम्हीं ओरडलो. ती हसत म्हणाली, "तुमचा वर्ग किती छान आहे, पुस्तके, वह्या बेंचवर व्यवस्थितपणे ठेवल्या आह...